जयदेव जयदेव जय नवग्रह देवा तुमचे ध्याना धरुनी विश्व करि सेवा ॥ध्रु. ॥
तेजस्वी रवि नमने जाती ही पापे आरोग्याते देवुनि नेती भव दुरिते ॥१ ॥
त्र्यंबक शीर्षे शोभे निर्मल चंद्राते तूझे स्मरण करिता यश देई त्वरिते ॥ २ ॥
मंगळ प्रसन्न होवूनि देई वैभवाते त्रैलोक्याचे सुखही नाही त्यापरते ॥३॥
बुध्दी चे बळ देतो ग्रह बुध हा खास वाणी वैभव देतो गुरू हा सर्वास ॥४॥
सर्व शास्त्रांमध्ये शुक्र हा चोख रवी पुत्र वर्णिता थकले विधिलेख ॥५॥
राहू केतू बलवान जाती गुरू भेटी सर्व नवग्रह दासा करी कृपा दृष्टी ॥६॥
जयदेव जयदेव जय नवग्रह देवा तुमचे ध्याना धरुनी विश्व करि सेवा ॥ध्रु. ॥